Monday, 12 January 2015

सखी

सखी


इंद्रधनुही वाटे कधीतरी मला अनोळखी
अशीच प्रिय वाटे जणु मजला माझी सखी..

चंद्रकलेसम तुझिया काया मनास तु हर्षी
हास्य तुझे बहु लाघवी मग मनात तु भरशी..

नयन तुझे वेडावती मजला ध्यास तुझा घेती
भेटशील तु नक्किच मजला आस नवी देती..

सप्त्स्वरान्ना फिके पाडसी मंजुळ असले स्वर तुझे
कौतुक सदा तुझिया करता होई वेंधळे मन माझे..

स्वप्न तुझे अन भास तुझे डोळ्यात साठलेले
वाट तुझ्या भेटिची पाहुन नयन ही दाटलेले..

स्पर्श तुझा मोहक खरा आनंदुन मन जाई
फुलासम कोमल तुझिया काया मोहरुन मज पाही..

न बोलता ही कधीतरी तु मन माझे वाचलेले
नकळत माझ्या डोळ्यांत तेव्हा आनंदश्रू साचलेले..

भातुकलीचा खेळ खेळण्या आलोय तुझिया वाटेला
किती बर अजुनी वाट बघावी सांग ह्या चातकाला....


चैतण्य ज्ञा. दातखिळे(चैतु )