Tuesday, 2 February 2016

तु येणारेस पन...

तु येणारेस पन...

तु येणारेस पन, बाकी मला माहीत नाही
आतुरलेल्या नयनान्ना और सुचेना ग काही
तु येणारेस पन, सांगता मला दिशा दाही
धावुन कवेत घेईल तुजला स्वप्न मी हेच पाही

तु येणारेस पन, रडवेल्या मज हसवण्या
उजळुदे गमतीचे क्षण अन साऱ्या आठवणी जुन्या
तु येणारेस पन, सोडवण्या माझा अबोला
होईल सुरु बडबड माझी होता तुझ्या अश्रूंचा स्पर्श ओला

तु येणारेस पन, हात माझा हाती घेण्या
स्वप्नांच्या दुनियेत तुजसव होइल मजला जाण्या
तु येणारेस पन, आयुष्यभर मज साथ देण्या
राहतील आयुष्यातील माझ्या आकांक्षा तरी काय उण्या...

~चैतु