आठवणीतला पाऊस
एकच छत्री ति अन मी, सोबत बरसणारा पाऊस
निस्तब्ध दोघे चिम्ब उभे, मनी गरजणारा पाऊस..
इंद्रधनुनी ल्याले ढग अन, हर्षणारा पाऊस
स्वच्छंदे मातीत मिसळण्या, तरसणारा पाऊस..
चमकले डोळे तिचे हे सुंदर दृष्य पाहुन
मला काय बोलायच हे, नेहमीसारखच गेल राहुन..
सगळ भान विसरुन निघालीच ति भिजायला
बॅग आणी छत्री मग होतोच मि सांभाळायला..
पाऊस म्हटल कि तिला भिजायचा ध्यास
त्याउलट मात्र माझ,मला आडोश्याची आस..
का कुनास ठाऊक आज पण भिजावस वाटल मला
अनवाणी चालाव दोन पावल,सोबत घेउन तिला..
बरसणा-या पावसातही डोळ्यात तिच्या आनंदाश्रू मि पाहिले
बोलायची गरज नव्हतीच काही, तिने मन माझे वाचीले..
आठवणीतला तो पाऊस बरच काही सांगुन गेला
गाठ मिळवुन दोन जीवांची, हसत तो चालता झाला...
चैतु...😌