तुझ ते नेहमीचच लटके रागावण
अन मी तुला जवळ घेवुन समजावुन सांगण
बोलायला मी लागल्यावर तु ते अधिरतेने ऐकण
अन ऐकता ऐकता माझ्या मिठीत सामवुन जाण...
मी नेहमी असाव तुझ्या बरोबर हे तुला वाटण
तुझा हातात घेता हात गालात खुदकन हासण
लपवल कितीही जरी तु तरी कळत मला तुझ लाजण
तुझ्या ह्या अदेवर मात्र माझ नित्याच भाळण...
वेड्यासारख प्रेम माझ्यावर अन वेड्यासारख तुझ वागण
मिळावीस तु मला हे माझ ठरलेल देवाकडे मागण
करायचय मला केसांत तुझ्या रोज गजर्याच माळण
भेट नक्कीच मला नाहीतर होईल आयुष्याच खेळण...
चैतु..