ओलावा
धावपळीच जीवन अन निसटता तुझ्या स्पर्श,
मन कशात लागत नाही अन भेटीचा तुझ्या हर्ष।
थकलेल्या तुझ्या हातांना हातात मी घ्यावं,
भिजलेल्या तुझ्या डोळ्यात नवचैतन्य वहाव।
स्त्री असुनही आपल्यासाठी, तु किती गं काम करावं,
वाटत खरच तुझ्यासोबत लहानग व्हावं।
एव्हढ करूनही तुझ्यात सांग कसा राहतो जीव?
बेमालुम ह्या नियतीला तुझी वाटेल का ग कधी कीव?
इतकं सगळं होऊनही हसत मात्र तू नेहमी राहतेस,
येतील आपले पण दिवस, वाट ह्याची नेहमी पाहतेस।
निर्मळ मजवर प्रेम तुझं जणू काजवा निरभ्र रातीतला,
तप्त जमीन, पहिला पाऊस, वास नव्याने मातीतला।
पाऊस पडता, सरिता भरता, सागराचा तो बोलावा,
नित्य स्मरतो मिठीत माझ्या तुझ्या कायेचा ओलावा।
-चैतु