सांज...
खळखळणार पाणी अन मधुर तुझी वाणी
फिका वाटे तेव्हाही मजला कोकिळेचा ध्वनी..
घालमेल त्या दोन जीवांची आठवेल का कुणी??
वार्यावरती विरुन जाईल सांज होवुणी जुनी..
भेदरल्या डोळ्यानी जेव्हा तु मला पाहिलेले
भिजल्या त्या डोळ्यांत नकळत पुर जणु वाहिलेले ...
शब्द मुके अन श्वास संथ स्फंदन तुझ चाललेल
ईवल्याशा डोळ्यानी तुझ्या जणु जग न्हावू घातलेल..
दुरुनच साद देवुनी मजला बोलती तु झाली
ऐकशील ना रे घट्ट मनाने..हाक तुझी मज आली...
थरथरणारा हात माझा अन रोमांचित तन झाले
दुराव्याचे तुझे बोल ऐकुनी मन दुखाने ल्याले
दिलीच नाहीस संधी मजला प्रश्न काही पुसाया
तळपत उण्हात एकटा मी दुर गेली तुझी छाया...
जा तु....विचारेल मी त्या मावळत्या सांजेला प्रश्न
ऐवढ्याच का साठी केले हे सारे मी यत्न...
आल्या त्या वाटेने पुन्हा मुक चालती तु झाली
बंद झाले हृदयाचे ठोके अन सांज दाटुन आली...अन सांज दाटुन आली..
चैतु..