काँक्रीटच्या घरात माझं मन काही रमेना
आहोत आपण दोघेच खरे पण उसंत काही मिळेना
महागड्या वस्तु असतानाही सुख काही दिसेना
चार भिंतीत कोंडुन स्वतःला आनंद काही असेना
चल ना जाऊ त्या घरात नसतील जिथे पक्क्या भिंती
मोकळं आभाळ आणि उघड्या खिडक्या नसेल तिथे कशाची भीती
अनुभवुयात आपण गॅलरीत बसुन समोर दिसणाऱ्या समुद्राची भरती
बहरलेली वनराई, स्वच्छंद प्राणी आणि नटलेली नववधुसम धरती

झोक्यावर बसुन मावळता सुर्य पाहताना चहा मला तु आणुन द्यायचाय
तु बघशील सुर्याकडे अन मी तुझ्याकडे, क्षण मला तो साठवायचाय
तुझ्याबरोबर बसुन घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवायचाय
घरी परतणाऱ्या पक्ष्यांनो "उद्या परत या रे" हा निरोप मला पाठवायचाय

बागेत फुलणाऱ्या सुंदर फुलांचा गजरा केसांत तुझ्या माळूदेत
एकत्र बसुन जुन्या आठवणीतले फोटो नव्याने चाळूदेत
दूध जाईल ऊतू अचानक चुलीवर, गेलं तर जाऊदेत
निवांत बसल्याचं समाधान कधीतरी तुझ्या चेहऱ्यावर पाहुदेत

दिवाबत्तीच्या वेळी येशील कंदील लावुन तु सामोरी
अंधुक दिव्याच्या प्रकाशात दिसशील मला खरी तु गोजिरी
हसशील गाली चोरून बघशील, नजर तुझी लाजरी
चंद्रच उतरून आलाय जणु समोर अन तिच माझी पौर्णिमा साजरी

वाढत्या वयाबरोबर तुला चष्मा सुद्धा लागुन जाईल
फाटलेला माझा सदरा घेवुन तु सुई दोरा ओवण्यास वाट माझी पाहील
वेळेच्या दोघांच्या गोळ्या अन खाण्यातल पथ्य काम माझं राहील
बरं वाटत नसेल तुला कधी तर अगदी स्वयंपाक सुद्धा माझ्या हातुन होईल

आता वेळ आली परतण्याची, माझ्या अगोदर जाऊ नकोस
तेव्हाही असेल तुझ्यासोबत, मागे वळुन पाहू नकोस
राहुदेत तशाच घरात आयुष्यभर काढलेल्या नक्षी
येतील कधीतरी राहायला तिथे आपल्यासारखे पक्षी...
- चैतन्य दातखिळे

खुप सुंदर
ReplyDelete